Saturday, November 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करा
0
SHARES
19
VIEWS
ShareShareShare

– संयुक्त कामगार आघाडीचे अर्धनग्न आंदोलन.

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर सोलापूरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तु (संच) वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे. यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे. यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेला बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी (महाराज), सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे, बहुजन पॅत्थर सेनेचे गणेश बोड्डू, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
शासन वप्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पिळवणूक व लुट थांबविण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामागर आयुक्तांना बांधकाम कामगार शिबीरे व ठोकण वाटप पध्दत बंद करण्याचे निवेदन दिले. परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाई झाली नाही. म्हणून दि. 07/10/2024 सोमवार रोजी विष्णु कारमपुरी (महाराज), बालाजी चराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक कामगारांनी बंद करा – बंद करा – ठोकण वाटप बंद करा, संयुक्त कामगार आघाडीचा विजय असो, सहाय्यक कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, नही चलेगा – नही चलेगा – ठेकेदार की दादागिरी नाही चलेगा, हमसे जो ठकराये गा – मिठ्ठी में मिल जाये गा, गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे लुटणाऱ्या हरामखोरांना अटक करा, आमच्या मागण्या मान्य करा – नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतय करणार नाही – केल्या शिवाय सोडणार नाही, निष्क्रीय कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, कामगार मंत्री – हाय – हाय, कामगार आयुक्त – हाय – हाय, मुख्यमंत्री – हाय – हाय, उपमुख्यमंत्री – हाय – हाय, फडणवीस – हाय – हाय, अजित पवार – हाय – हाय. अशा घोषणा दिल्या आणि ठोकण पध्दती बंद व ठेकेदारी बेकायदेशीर शिबीरे बंद न झाल्यास मा. मुख्यमंत्री यांना सोलापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्यात येईल. असाही इशारा संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आल .


सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णु कारमपुरी (महाराज), अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी चराटे, सुहेल शेख, वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुध्द भ्रष्टाचाराचे जोरदार प्रहार केला. आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीला त्यांची जागा दाखवू असेही जाहिर केले.


विष्णु कारमपुरी (महाराज), अंगद जाधव, गणेश बोड्डू, बालाजी चराटे, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई ईप्पा, विठ्ठल कुऱ्हाडकर, शिवा ढोकळे, गणेश म्हंता, गुरूनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, ओंकार चराटे, आदित्य भोसले, पवन कोळी, दत्ता कलाटे, प्रशांत जक्का, लहु गायकवाड, जयजीद देवकते, विनय बोड्डू, सोहेल जागीरदार, सपना गदघाटे, दीपक दुधाळे, हेमंत दवळशंकर, सिंकदर मनीयार, सादीक शेख, जुब्बेर शेख, केदार दवखुळे, भोळाशंकर अटकर, सतीश असादे, अलका जमदाडे, नाभिका लोखंडे यांच्यासह बांधकाम कामगार बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी आंदोलनात आलेल्या बंधु – भगिनींचे आभार मानले. आणि पुढील आंदोलनात सहभाग होण्यासाठी आवाहन केले.

Previous Post

रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणी

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
Next Post
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.