MH 13News Network
अल्पावधीत आपल्या अर्थ व्यवहारामुळे आणि सचोटीमुळे जनहित पतसंस्था नावारूपाला आली आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा बचत गटातील लाडक्या बहिणीसाठी कर्ज वितरण करून सभासदांशी असलेले ऋणानुबंध पतसंस्थेने दाखवून दिले.
आज रविवारी पतसंस्थेतील श्री गणेशाची विधिवत पूजा पत्रकार महेश हणमे यांच्या हस्ते पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये करण्यात आली.
पूजेनंतर जनहित पतसंस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती चेअरमन आनंद जमदाडे यांनी पत्रकार हणमे आणि उपस्थित बचत गटाच्या सदस्यांना दिली. केवळ चार वर्षातच शेकडो सभासदांना केलेलं कर्ज वितरण, पतसंस्थेतील ठेवी, पिग्मी, आणि इतर व्यवसायिक योजना याबद्दल त्यांनी माहिती दिली.
श्रींच्या पूजेनंतर बचत गटातील लाभार्थी महिला सभासदांसाठी चेअरमन जमदाडे तसेच पुष्पा पडसगी यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले.
यावेळी लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले. त्याचसोबत आमच्यासाठी एक हक्काचा भाऊ चेअरमनच्या रूपाने मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित असलेल्या महिला सभासदांनी व्यक्त केली.
यावेळी जनहित पतसंस्थेचे चेअरमन आनंद जमदाडे,महिला बचत समन्वयक अधिकारी पुष्पा पडसगी, यांच्यासह महिला बचत गटाच्या सभासद उपस्थित होत्या.