सोलापूर / प्रतिनिधी लोकमंगल बँक व लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य भजन व भारुड स्पर्धेची सुरुवात ह.भ. प.सुधाकर इंगळे, लोकमंगल बँकेचे संचालक शितल कोकाटे, जितेंद्र लाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस , लोकमंगल फाउंडेशनच्या व्यवस्थापिका दिपाली कोठारी,नीलिमा शितोळे, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांच्या हस्ते सुरूवात झाली.
भजन आणि भारुड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक मंडळांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. परीक्षकांच्या माध्यमातून भजन आणि भारुड यांची गुणवत्ता तपासून बक्षिसे देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळी परिसरातील महिला वर्गांची मोठी उपस्थिती होती.
ही स्पर्धा जगदीशश्री मंगल कार्यालय येथे दोन दिवस सुरू राहणार आहे.यावेळी लोकमंगल बँक व लोकमंगल फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.