लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला सकल मराठा समाजाच्या वतीने जोडेमार आंदोलनशहरात मरीआई चौकात मराठा आंदोलकांची प्रचंड घोषणाबाजी सोलापूर /प्रतिनिधी आज शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. मरीआई चौकात मराठा आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केली.काल रात्री हाके यांचा मद्यधुंद असणारा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. पुणे येथील मराठा समाजातील आंदोलकांनी याबाबत पोलीस चौकीमध्ये धाव घेतली होती.
याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात हाके यांच्या विरोधात निषेध आंदोलन घेण्यात आले. यावेळी हाके यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे, आरक्षण आमच्या हक्काचं, या सरकारचं करायचं काय..? अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या. या वेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार ,राजन जाधव, गणेश देशमुख, औदुंबर बुवा जगताप, महादेव गवळी, सुनील कदम, नागा पवार,वामन जगताप, शाम गांग्रदे,लहू गायकवाड , पंडित गणेशकर,विष्णू जगताप, ईश्वर अहिरे मराठा आंदोलक उपस्थित होते.
मराठा -ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, संभाजी राजे छत्रपती यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आज सोलापुरात निषेध व्यक्त करण्यात आला. दारू पिलेल्या अवस्थेमध्ये हाके पुण्यामध्ये आढळून आले. यावरून त्यांची नैतिकता आणि संस्कृती समजते. दोन समाज हे प्रत्येक गावामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र हाके सरकारच्या सांगण्यावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. यावरच जर त्याला अक्कल आली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल.
माऊली पवार, सकल मराठा समाज