Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत २०२४-२५ मध्ये महसूल वृद्धीत उल्लेखनीय वाढ

MH 13 News by MH 13 News
6 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक
0
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत २०२४-२५ मध्ये महसूल वृद्धीत उल्लेखनीय वाढ
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी विभागाने रु.२,२५,३०० कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला आहे, जो संपर्ण महाराष्ट्र राज्याच्या कर महसुलातील ६०% पेक्षा जास्त आहे. यामध्ये मागील वर्ष २०२३-२४ पेक्षा १३.६% वाढ झाली असून वर्ष २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नमुद रु. २,२१,७०० कोटी महसुलीचा अंदाज ओलांडला गेला आहे.

तक्ता १ : महाराष्ट्र राज्य कर विभागाची कामगिरी २०२४-२५ : रक्कम कोटी मध्ये

विभाग२०२३-२४ वास्तविक वृद्धी२०२४-२५ तात्पुरती२०२३-२४ पेक्षा २०२४-२५ वाढ
जीएसटी१,४१,९७९१,६३,०१६१४.८ टक्के
व्हॅट५३,३८०५९,२३१११.० टक्के
पीटी२,९५३३,०७२४.० टक्के
एकूण१,९८,३१२२,२५,३१९१३.६ टक्के
वाढ१०.९ टक्के१३.६ टक्के

विभागाने विशेषतः वस्तू व सेवा कर (GST) कायद्याअंतर्गत येणाऱ्या महसुलात १४.८% वाढ दर्शविली आहे. त्याचबरोबर, संपूर्ण देशातील एकूण GST महसूल वाढीचा दर फक्त ८.६% असून महाराष्ट्राने या क्षेत्रात इतर राज्यांपेक्षा खूपच वेगाने प्रगती केली आहे.

या उल्लेखनीय यशामागे, करदात्यांच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणाऱ्या आणि फॉलो- अप करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत.

सर्वात जास्त GST महसुल वाढीचा दर

सकल GST महसूलात परतावे वजावटीपूर्वीची वाढ १५.६% इतकी उल्लेखनीय आहे. हा दर प्रमुख राज्यांमधील सर्वाधिक आहे. GST महसुल संकलनातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश (रु.८४,२०० कोटी) च्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने दुप्पटीपेक्षा जास्त महसुल गोळा केला आहे. देशातील शीर्ष सात राज्यांमध्ये विचार केल्यास महाराष्ट्राने सर्वात जास्त GST महसुल वाढीचा दर प्राप्त केला आहे. आर्थिक दृष्टीने पाहता, विभागाने एकूण रु.१,७२,३७९ कोटी महसूल संकलित केला आहे, ज्यात रु.१,१३,७६९ कोटी राज्य GST (SGST) व रु.५८,६१० कोटी इंटिग्रेटेड GST (IGST) चा समावेश आहे. तसेच, परताव्यातील वाढ (३०.४%) देखील या विभागाची करदात्यांना लवकर परतावा जारी करण्याची क्षमता दर्शवते, ज्यामुळे पुरवठादारांसाठी कार्यशील भांडवल प्राप्त होते.

राज्याच्या महसुल वाढीच्या यशामध्ये मोलाची भूमिका

राज्याच्या महसूलातील निरंतर वाढ ही महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीबरोबरच GST विभागाच्या अतिरिक्त प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. डेटाचे सखोल विश्लेषण, अंमलबजावणी प्रकरणांचे निकट निरीक्षण, तसेच फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई, बनावट ITC दाव्यांशी निगडीत संस्थांविरुद्ध कारवाई आणि कठोर वसुली या सक्रिय प्रयत्नांनी राज्याच्या महसुल वाढीच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. वस्तू व सेवा कर विभागाचे अथक प्रयत्न अपेक्षेपेक्षा अधिक वाढीस कारणीभूत ठरले नाहीत तर महाराष्ट्राच्या इतर सर्व कर स्रोतांमध्ये देखील सर्वाधिक वाढ दर्शवते.

Previous Post

कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त

Next Post

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात…!

मनसे स्टाईल | जेव्हा मनसैनिक शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटतात...!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.