mh 13 news network
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीने विधानभवनाच्या पायऱ्यापाशी आंदोलन केले.
शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे,
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, बळीराजा त्रस्त, सत्ताधारी मस्त, निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली, शेतमालाला कवडी मोलभाव, सरकार खातय हमीभाव असे पोस्टर उंचावून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.