Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा; दोषींवर कारवाई करा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा; दोषींवर कारवाई करा
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश

जळगाव – महावितरणच्या तारा चोरीची प्रकरणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा तसेच याला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील 360 जलजीवन योजनेची कामे झाली असून त्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात, तसेच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असेही पालकमंत्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यातील महावितरणच्या प्रश्नासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह ( अजिंठा ) येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हा पोलीस अधिकारी अशोक नखाते, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, महाजनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते.

जिल्हा नियोजनच्या निधी मधून मागील 5 वर्षात सुमारे 1 हजार 400 एवढी विक्रमी रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर ) देण्यात आले.  हे सगळे देऊनही वेळेत कामं होत नसतील तर लोकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते. त्यामुळे महावितरणने आपल्या कामात झपाट्याने बदल करावा आणि जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे पूर्ण करावीत असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या डीपी साठी वितरण पेट्या आणि कट आउट चे प्रस्ताव जिल्हा नियोजनसाठीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, गावागावात तारा लोंबकळत आहेत, त्यामुळे त्या अधिक धोकादायक आहेत. त्या तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. तसेच जीर्ण झालेले पोल बदलण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देऊन जिल्ह्यात वीजेमुळे मयत झालेल्यांना तसेच गंभीर दुखापत झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे असे आदेशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील यांनी महावितरणसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात मंजूर केले आहेत. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन स्थानिक आमदारांना सोबत घेऊन करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

Previous Post

राज्य सेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार 

Next Post

ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

ज्येष्ठांचे जीवन सुखकर करणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.