ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे
सोलापुरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. उत्कृष्ट मिरवणूक पुरस्कार मिळवणारे ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या यंदाच्या 2025 शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी महेश ठाकरे यांची सर्वानुमते निवड मंडळाचे संस्थापक संजय पारवे यांनी केली.
दरम्यान, मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी मध्यवर्तीचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे,मध्यवर्तीचे सचिव महेश हणमे खजिनदार मारुती सावंत यांचा सत्कार ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

यानंतर ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे नूतन उत्सव अध्यक्ष महेश ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून सिद्धू कोळी, खजिनदार समर्थ सुरवसे, तुकाराम पाटील, सचिव अमोल गोरे,कार्याध्यक्ष प्रशांत कदम, मिरवणूक प्रमुख अक्षय वाघे,सोमनाथ जाधव,प्रसिद्धीप्रमुख राहुल सावंत, गणेश बारवकर, पांडुरंग पुकाळे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्तीचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे, सचिव महेश हणमे यांनी मनोगत व्यक्त केले.
गतवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान मिरवणूक सोहळा सोलापुरातील सर्व शिवभक्तांनी आवर्जून पहावा असं आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानचे संस्थापक संजय पारवे, गतवर्षीचे उत्सव अध्यक्ष दत्ता परसे, सोमनाथ पवार, शत्रू कुरणे, ज्ञानेश्वर पवार माऊली सुरवसे आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदाधिकारी निवड होताच मध्यवर्तीचे ट्रस्टी ,ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे यांनी उत्सव अध्यक्ष महेश ठाकरे यांचे अभिनंदन केले. तसेच मध्यवर्तीच्या वतीने मंडळास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.