महेश हणमे /MH 13news
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस भविष्यात मानला जाईल. आज शनिवारी रात्री साधारण 2 वाजून 50 मिनिटांनी मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथून समोर जमलेल्या असंख्य मराठा बांधवांसमोर सगे सोयऱ्यांसाठी कुणबी प्रमाणपत्राचा अध्यादेश मिळाला असल्याची माहिती दिली. यावेळी असंख्य मराठा समाज बांधव त्यांचे शब्द ऐकण्यासाठी उभा ठाकला होता.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सकाळी याची घोषणा करतील असेही त्यांनी आता काही वेळापूर्वी जमलेल्या असंख्य मराठा बांधवांसमोर सांगितले. सद्यस्थितीत मनोज जरांगे पाटील हे वाशी येथे मुक्कामासाठी आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबई पायी वारीला लाखोंच्या संख्येने सहभागी झालेले मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत.
या आधीच मराठा आंदोलकावरील राजकीय गुन्हे मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तसे आदेश दिले आहेत.
गरजवंत मराठ्यांसाठी लढा उभा करणारे मनोज जरंगे पाटील मोफत शिक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. केजी टू पीजी या संपूर्ण शिक्षणासाठी मराठा समाजाला संपूर्णपणे मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. उद्या सकाळी याबाबत हे निर्णय होऊ शकतो.
आजच सगेसोयऱ्या बाबत अध्यादेक्ष काढा याबाबत मनोज जरांगे पाटील आग्रही होते. 26 जानेवारी रोजी दुपारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा असंख्य मराठ्यांसमोर मांडली. आझाद मैदान वर न जाता आजच्या दिवशी मोर्चा वाशीतच ठेवू असे आश्वासन दिले.