Sunday, September 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मराठा समाजाचा ‘बंद’चा इशारा | प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी कडक कारवाईची मागणी..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
मराठा समाजाचा ‘बंद’चा इशारा | प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी कडक कारवाईची मागणी..
0
SHARES
70
VIEWS
ShareShareShare

प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक – आरोपींवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा

सोलापूर, दि. १४ जुलै (प्रतिनिधी):

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन सादर करून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात असे म्हटले आहे की, हल्लेखोरांमध्ये दीपक काटे या सराईत गुन्हेगाराचा समावेश असून, हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे हल्ल्याच्या गांभीर्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.

समाजाच्या मते, प्रवीण गायकवाड हे मराठा समाजातील प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यावर शाईफेक व मारहाण होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे.”

आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट?”

हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असली, तरी त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई ऐवजी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा आरोप समाजाकडून करण्यात आला आहे.

“आरोपींना दूध देऊन मानपान केला जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही,” असा रोष समाजबांधवांनी व्यक्त केला.

३०७ अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे – अन्यथा तीव्र आंदोलन

राज्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यालाही तसाच कायदेशीर दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका समाजाने मांडली आहे.

अन्यथा,अक्कलकोट बंद, सोलापूर जिल्हा बंद आणि गरज पडल्यास राज्य बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

उपस्थित प्रमुख नेते व पदाधिकारी:

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, सकल मराठा समाजाचे राजन जाधव, माऊली पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे भोसले, शहरप्रमुख शिरीष जगदाळे, तसेच मराठा समाजातील तुकाराम मस्के, भाऊ आवताडे, गणेश देशमुख, विनोद भोसले, गणेश डोंगरे, शेखर फंड, चेतन चौधरी, महेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध: मराठा समाज आक्रमक, उद्या सोलापूरमध्ये तातडीची बैठक

Next Post

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.