Sunday, September 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
माजी महापौर सपाटेंचा पाय खोलात..? अटक न झाल्यास चक्री उपोषणाचा इशारा..
0
SHARES
585
VIEWS
ShareShareShare

सोलापूर, दि. १४ जुलै (प्रतिनिधी):

सोलापुरात एका महिलेसोबत कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे (वय – ७२) यांच्यावर BNS कलम 74, 75, 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून, “अटक करा अन्यथा चक्री उपोषण” असा इशारा देण्यात आला आहे.

22 हून अधिक गुन्ह्यांचा आरोप – राजकीय संरक्षण मिळाल्याचा दावा

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये सपाटे यांच्यावर यापूर्वीच २२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, ते “राजकीय संरक्षण प्राप्त असलेले गुंड आणि लैंगिक विकृती असलेले आरोपी” असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात स्थानबद्धतेची (Preventive Detention) कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

“रुग्णालयात नाटक; अटक टाळण्याचा प्रयत्न”

सपाटे यांनी अटक टाळण्यासाठी आजाराचे नाटक करून गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या खासगी रुग्णालयात स्वतःला दाखल केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला.

त्यामुळे सपाटे यांना तातडीने अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना…

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांनाही देण्यात आली असून, जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर संविधानिक मार्गाने चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पीडितेला पैशाचं आमिष? – अ‍ॅड. योगेश पवार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई येथून पीडितेला कायदेशीर सहाय्य करणारे अ‍ॅड. योगेश पवार यांनी मनोहर सपाटे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सपाटे आणि ज्ञानेश्वर सपाटे यांनी पीडित महिलेला पैशाचं आमिष दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

“पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पीडित महिलेने स्वतः त्यांना कॉल करून ही माहिती दिली असून, या संवादाचं कॉल रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे, असा दावाही त्यांनी केला.

जामीन अर्जावर पुढील सुनावणी १६ जुलै रोजी..

आज (१४ जुलै) सोलापुरातील न्यायालयात सपाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने पुढील तारीख १६ जुलै २०२५ दिली आहे.—

ही घटना सोलापुरातील समाजकारणात आणि राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ठरली असून, मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा पाहता आगामी काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

मराठा समाजाचा ‘बंद’चा इशारा | प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी कडक कारवाईची मागणी..

Next Post

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी  ‘त्या’ दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

खानदानी दुश्मनीतून दुहेरी खून प्रकरणी 'त्या' दोघा संशयित आरोपींना हायकोर्टातून जामीन..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.