Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार

MH13 News by MH13 News
9 months ago
in नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

शिखर पहारीया फाउंडेशन ,भारती विद्यापीठ यांचा स्तुत्य उपक्रम

शहर व परिसरातील 5 हजारहून अधिक उमेदवारांचा सहभाग

सोलापूर : रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे आज काळाची गरज आहे.शिखर पहारीया फाउंडेशन ,भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब फेअर हा चांगला उपक्रम राबविला.जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

शिखर पहारीया फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व क्यू. जे. पी .आर. ग्रुप यांच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठ सोलापूर येथे जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या जॉब फेअरचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, झवेरी एंटरप्राईजेस संदीप झवेरी, क्यू.जे. पी .आर. ग्रुप तर्फे मारुती गायकवाड व इतर मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.

या जॉब फेअर मध्ये सोलापूर, पुणे ,मुंबई ,बेंगलोर ,गोवा ,हैदराबाद ,अशा विविध ठिकाणाहून ८० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये आय.टी. ऑटोमोबाईल ,कन्स्ट्रक्शन, प्रोडक्शन, एज्युकेशन, फायनान्स, हॉस्पिटल, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता व 9 हजारहून अधिक वेकन्सीज होत्या. सोलापूर शहर व परिसरातील 5 हजारहून अधिक उमेदवारांनी या जॉब फेअर मध्ये सहभाग नोंदवला. दहावीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व उमेदवारांसाठी हा जॉब हेअर फेअर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता.

आपल्या स्वागत पर भाषणामध्ये संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी भारतीय विद्यापीठ नेहमीच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिखर पहारीया फाउंडेशनचे समन्वयक राज सलगर यांनी शिखर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत व शिखर पहारीया फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे, समन्वयक तन्वीर शेख, कौशल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. साक्षी बरबडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट समन्वयक डॉ. शबनम माने यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले. हा जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठातर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिखर पहारीया फाउंडेशन फाउंडेशन तर्फे समन्वयकांनी परिश्रम घेतले.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर: #Breaking छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलावात) आढळला मृतदेह

Next Post

Mohol | गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

Mohol | गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.