Sunday, August 31, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

MH 13 News by MH 13 News
10 months ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते  सायं. ६ वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :

अ.क्र.मतदार संघांची संख्यामतदान केंद्रेसहाय्यक मतदान केंद्र क्रिटीकल मतदान केंद्रेनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याबॅलेट युनिट (बीयु)कंट्रोल युनिट(सीयु)व्हीव्हीपॅट
12881001862419904,1361,64,9961,19,4301,28,531

राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  1. मतदारांची संख्या
अ.क्र.मतदारांचा तपशील. (दिनांक 30.10.2024 रोजी)पुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकूण
1मतदारांची संख्या5,00,22,7394,69,96,2796,1019,70,25,119
2दिव्यांग (PwD) मतदार3,84,0692,57,317396,41,425
3सेना दलातील मतदार (Service Voters)1,12,3183,852–1,16,170
  1. राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकूणनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या
116 नांदेड लोकसभा मतदार संघ9,78,2349,30,15815419,08,54619
  1. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.
  2. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
  • मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही सरमिसळीकरण (Randomization) देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.
  1. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
  2. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
  3. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले तर उचित कार्यवाही करण्यात येत आहे.
  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.
  1. मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.
  2. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 288 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. सबब या विधानसभा मतदार संघांमध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदार संघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सर्व तयारी झालेली आहे. या निवडणूकीमध्ये  मोठया प्रमाणात    मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

 4)   राज्याची माहिती:

अ)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था):- दिनांक  17.11.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.तपशीलसंख्या
1.राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने78,267
2.जमा करण्यात आलेली शस्रास्रे56,604
3.जप्त करण्यात आलेली शस्रे235
4.जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे2,206
5.परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे611
6.परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे20,495
7.राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून बीएनएसएस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या79,856

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, 288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त  मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

ब)    राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

राज्यामध्ये दि. 15.10.2024 ते दि. 17.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातू इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.जप्तीची बाबपरिमाणरक्कम (कोटी मध्ये)
1रोख रक्कम–153.01
2दारु68,51,364 लिटर68.63
3ड्रग्ज1,01,42,452 ग्राम72.00
4मौल्यवान धातू1,64,72,596  ग्राम282.49
5फ्रिबीज57,949  (संख्या)3.78
6इतर13,73,775 (संख्या)75.60
एकुण–655.53

क)         दि. 15.10.2024 ते 17.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजील ॲप वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 8386 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 8353 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टल वरील  13,807 तक्रारीपैकी 9,132 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

ड)       माध्यम देखरेख व संनियत्रण समिती (PRE CERTIFICATION / APPELLATE – MCMC):- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि. 17.11.2024 पर्यंत 228 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 1559 जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

Previous Post

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

Next Post

स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

Related Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !
राजकीय

गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !

30 August 2025
लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती
महाराष्ट्र

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती

30 August 2025
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय
महाराष्ट्र

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न; आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारचा निर्णय

30 August 2025
क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव
महाराष्ट्र

क्रीडा दिनानिमित्त सोलापूरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव

30 August 2025
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास
महाराष्ट्र

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास

30 August 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार
नोकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करार

30 August 2025
Next Post
स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.