MH 13 News Network
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे आज सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज सकाळी साडेनऊ वाजता कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी उपस्थित राहावे असे आवाहन एम के फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
असा आहे रॅलीचा मार्ग..!
.महादेव कोगनुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पन्नास अपार्टमेंट विजापूर रोड ते दक्षिण तहसील कार्यालय असा रॅलीचा मार्ग असणार आहे.
यंदा, दक्षिण विधानसभा मतदारसंघात तगडी फाईट होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारीने एम के फाउंडेशन च्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या जोरावर महादेव कोगनुरे हे आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.