Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राजदूतांना गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट…

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
राजदूतांना गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट…
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिल्लीत

नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासांमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्रीगणेशमूर्तीची स्थापना

नवी दिल्ली  :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या दूतावासांना प्रतिकात्मक श्रीगणेशाची  मूर्ती भेट दिली. अनेक देशाच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे आभार मानले.

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. विविध देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सर्व देशांचे राजदूत नवी दिल्लीत कार्यरत असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उकडीचे मोदक आणि श्रीगणेशाची मूर्ती भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने विविध देशांच्या राजदूतांना देण्यात आली. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन, मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सेलस, कुवेतचे राजदूत मेशाल मुस्तफा अलशेमाली, लॅटव्हियाचे राजदूत ज्युरीस बोन, लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकेव्हीसीएनी यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती  व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानले. तसेच अन्य सर्व राजदूतांनी आभार मानले.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठळकपणे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. भारताला सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी महाराष्ट्राने दिली. देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात तसेच जडणघडणीतही गणेशोत्सवाची भूमिका महत्वाची होती. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक, उद्योग आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध देशाच्या राजदूतांना महाराष्ट्राच्या उत्साही आणि सकारात्मक उत्सवी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व देशांच्या प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक भावना व्यक्त केल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानले.  तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद 

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.