Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

नाशिक : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या अनुषंगाने आयोजित सर्व संबंधित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगुरुळे, तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तंतोतंत, जबाबदारीने, गांभीर्याने व लक्षपूर्वक पार पाडावी, असे सांगून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 24 तासांच्या कालावधीत सर्व शासकीय इमारती, कार्यालय, परिसर, शासकीय संकेतस्थळे यावरील राजकीय पदाधिकारी यांची छायाचित्रे काढण्यात यावीत. तसेच राजकीय पक्षांशी संबंधित जाहिरात फलक, बॅनर, कोनशिला यासारखे राजकीय स्वरूपाची फलक हे आदर्श आचारसंहिता कालावधीत व्यवस्थितरीत्या झाकण्यात यावेत. तसेच याबाबतचा अहवाल आचार संहिता कक्षाकडे सादर करण्यात यावा. निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता, जाहिरात प्रसारणासाठी माध्यम प्रमाणिकरण समितीची परवानगी तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचा खर्च देखील निवडणूक खर्चात अंतर्भूत असल्याचे पत्र राजकीय पक्षांना देण्यात यावे. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यावरही सर्वांनी लक्ष ठेवून त्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. त्याच प्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी या बैठकीत दिले.

राजकीय पक्ष प्रतिनिधींचीही बैठक

यानंतर राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्शआचार संहिता कालावधीत राजकीय पक्षांसाठी लागू असणारी माहिती देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विषद केली. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी असलेल्या शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.

.

Previous Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

Next Post

मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग – जिल्हाधिकारी किशन जावळे

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग – जिल्हाधिकारी किशन जावळे

मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग – जिल्हाधिकारी किशन जावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.