Saturday, June 28, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महापालिकेने पावसाळापूर्व कामे त्वरित पूर्ण करावे आ. सुभाष देशमुख यांचे अधिकार्‍यांना आदेश

MH 13 News by MH 13 News
8 June 2024
in सोलापूर शहर
0
महापालिकेने पावसाळापूर्व कामे त्वरित पूर्ण करावे  आ. सुभाष देशमुख यांचे अधिकार्‍यांना आदेश
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर


जून महिन्यापासून पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्क रहावे, लवकरात लवकर नालेसफाई, डे्रनेज लाईन सफाईसह पावसाळीपूर्व कामे करावीत, असे आदेश आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिले आहेत.
आ. सुभाष देशमुख यांनी गुरूवारी मनपा अधिकार्‍यांसमवेत बैठक घेवून पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला. शहर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्या संबंधीची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली.
आ. देशमुख म्हणाले, शहर दक्षिण मतदारसंघात योग्य दाबाने नियोजित वेळेत पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच अनेक ठिकाणी नविन विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत अशा ठिकाणी लाईडी बसवावेत, हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता असते अशा ठिकाणी स्ट्रॉम वॉटर लाईन करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन खराब अथवा निकामी झाली आहे अशा ठिकाणी चेंबर कव्हर बसवून लेव्हल करावे, सार्वजनिक आरोग्यचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी प्रामुख्याने स्वच्छता राखली जावी यासाठी हद्दवाढ भागातील नाले व खुल्या गटारांची स्वच्छता, नालासफाई करून पाणी तुंबणार नाही याची व्यवस्था लावावी, आवश्यक असेल त्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी करणे, सार्वजनिक शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता व निगा राखावी, रस्त्याच्याकडेला मोकळ्या जागी साठणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, तसेच प्रताप नगर व लोकु तांडा भागातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून ते शेतात जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

पावसाळ्यात रस्त्यालगत व दुभाजकांमधील वाढणारी काटेरी झुडपे काढून टाकाणे, कच्च्या रस्त्यावर मुरूर टाकून वाहतुकीस रस्ता सुरक्षित करणे, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यावर उपायोजना करून पावसाळ्यात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचीही सूचनाही आ. देशमुख यांनी दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपआयुक्त भगत, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, शहर दक्षिण मतदारसंघातील मनपाचे विभागिय अधिकारी, इंजिनियर, मनपा लाईट विभागचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी

Next Post

जुळे सोलापुरात अश्‍विन्स वसंत शोरूमचा 9 जून रोजी शुभारंभ

Related Posts

Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!
धार्मिक

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

24 June 2025
ब्रेकिंग | सोलापुरातील तिघांचा डंपरने उडवून दिल्याने मृत्यू..
सामाजिक

ब्रेकिंग | सोलापुरातील तिघांचा डंपरने उडवून दिल्याने मृत्यू..

26 June 2025
Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम
शैक्षणिक

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

20 June 2025
Next Post

जुळे सोलापुरात अश्‍विन्स वसंत शोरूमचा 9 जून रोजी शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.