Friday, April 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

mh13news.com by mh13news.com
3 days ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, व्यापार, सोलापूर शहर
0
0
SHARES
33
VIEWS
ShareShareShare

MH 13 news network


सोलापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ७२ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नेपाळ येथील आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, एका अनोळखी महिलेने WhatsApp व Facebook द्वारे फिर्यादीशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध ऑनलाईन लिंक पाठवून फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ७२,६४,००० रुपये जमा करून घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली.



या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच आयटी अॅक्ट कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी ९ मार्च २०२६ रोजी नेपाळ येथील आरोपी रोज थापा मगर राधेशाम यास दिल्ली येथून अटक केली. त्यानंतर त्याला सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. मोर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.

दरम्यान, आरोपीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसून, केवळ संशयावरून अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद करत जामीन मंजूर करण्याची मागणी केली.

यास तपासी अधिकारी व सरकारी वकिलांनी जोरदार विरोध दर्शविला. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. सुरेश बिराजदार, अॅड. स्नेहा पासनूर व अॅड. लक्ष्मी हेब्बाळे यांनी काम पाहिले.

Tags: adv suresh birajdar solapur court nepali share market stock market
Previous Post

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

Next Post

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

Related Posts

धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
Next Post

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.