MH 13News Network
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त निर्मल नारी शक्ती सन्मानाचे थाटात वितरण
इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे 8 मार्च जागतिक दिनानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री सचिन टोकळ, प्रमुख पाहुणे आमदार प्रणिती ताई शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे तर संचालिका शिल्पा ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, माजी नगरसेविका पूनम बनसोडे, प्रा. श्री. गणेश देशमुख,पालक प्रतिनिधी सौ कुंभार, सौ. कोळे, प्राचार्य डी गाजरे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
दिपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कारानंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंदिरा प्राथमिक शाळा, श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने 6 ज्येष्ठ माता पालक (आजी) तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 8 कर्तुत्वान महिलांना ‘ निर्मल नारी शक्ती सन्मान 2024’ ने सन्मानित करण्यात आले. प्रथमत माजी प्राध्यापक श्री गणेश देशमुख यांनी स्त्री -जीवन व महात्म्य याविषयी आपले मार्मिक मत व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सॅनिटरी पॅड डीस्पोजर मशीनचे तसेच पर्यवारणपूरक प्लास्टिकला पर्याय म्हणून शाळेचे नाव असलेले कापडी पिशव्याचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
महिला दिनाच्या याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ तसेच शाळेच्या सहशिक्षिका सौ. पूनम चव्हाण यांचा पालकांच्या वतीने मनाचा सत्कार करण्यात आला.
महिला दिनानिमित्त कु आदिती काटमोरे, कु. प्रणाली साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 8 मार्च महाशिवरात्रीनिमित्त कु. विधी काळे हिने कॅसिओ वर हर हर शंभो….. हे गीत सदर केले. इयत्ता 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी कृतियुक्त 19 खडीचे सादरीकरण केले. महिला दिनानिमित्त इ.5वी ते 7वी च्या विद्यार्थिनींनी नृत्यातून महिलांचा जागर केला.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, आमदार प्रणितीताई शिंदे, पोलीस उपयुक्त डॉ दीपाली काळे आदी मान्यवरानीं कार्यक्रमाच्या नीटनेटक्या नियोजनाबद्दल शाळा व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमास 500 हुन अधिक महिला पालकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास प्राचार्य श्री डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. कदम पी. के. यांनी केले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई ठोकळ, संस्थेचे अध्यक्ष अँड. श्री.विपीन ठोकळ, उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, संचालिका सौ. शिल्पाताई ठोकळ यांनी शाळेचे अभिनंदन केले.