Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक; मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ

मालेगाव,: धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 115-मालेगाव बाह्य मतदारसंघात आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी एकूण 21 मतदारांनी घरुन आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघ निवडणूकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदार संघात पंधरा (15) 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर सहा (6) दिव्यांग असे एकूण 21 मतदारांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 115-मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात आज (12 मे) रोजी गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी संपूर्ण मतदार संघासाठी 2 टीमची नियुक्ती केली होती. प्रत्येक टीममध्ये चार अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून या टीमने मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान

नोंदवून घेतले आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघात गृह मतदानासाठी 432 ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी विधानसभा मतदार संघनिहाय पहिल्या फेरीत आजपर्यंत झालेले गृह मतदान धुळे शहर (49), धुळे ग्रामीण (86), शिंदखेडा (105), बागलाण (98) मालेगाव मध्य (24), मालेगाव बाह्य (21) असे एकूण 383 मतदान नोंदविण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गृह मतदार दुसऱ्या फेरीत घेण्यात येणार आहे.

Previous Post

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान       

Next Post

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

Related Posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”
महाराष्ट्र

नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”

13 January 2026
मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”
महाराष्ट्र

मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”

13 January 2026
Next Post
साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.