MH 13News Network
मराठा महिला उमेदवारांसाठी पवार,’नेता,मोहिते उपमुख्यमंत्र्यांकडे..!
मराठा महिला उमेदवारांसाठी अधिसंख्या पदे निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप नेते शहाजी पवार, माजी नगरसेवक अनंत जाधव, मराठा नेते रवी मोहिते यांनी केली. मंगळवारी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस सोलापुरात होते. त्यादरम्यान, विमानतळावर ही भेट झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठा समाजातील महिला उमेदवार यांचेवर प्रशासनाने योग्य कायदेशीर निवड प्रक्रिया न राबवल्याने अन्याय झाला असून त्यांच्यासाठी आधी अधिसंख्या पद निर्माण करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करणेबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारसीनुसार गृह विभागात आहे.
मराठा समाजातील महिला उमेदवार यांच्यासाठी अधिसंख्या पदे निर्माण करण्यासाठी सकारात्मक प्रस्ताव येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना देऊन आदेश द्यावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली.गृह विभागात प्रलंबीत असलेल्या प्रस्तावात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय,न्यायालयाचे निकाल व सर्व शासन निर्णय जोडलेले असल्याचे यावेळी मराठा समाजातील शिष्टमंडळाने सांगितले.
मराठा महिला उमेदवार सारिका भोसले यांच्यासह सात जणांच्या अधिसंख्या पदनिर्मितीचा प्रश्न रेंगाळलेला होता. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केलेला असून गृहमंत्र्यांकडे निवेदन दिल्यामुळे लवकरच सकारात्मक निर्णय होईल.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यास अनेक महिला उमेदवारांना याचा लाभ होईल.असे मत माजी नगरसेवक अनंत जाधव, मराठा नेते रवी मोहिते यांनी व्यक्त केले.