Tuesday, July 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in कृषी
0
खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

मुंबई, : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा

खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

योजनेतील वैशिष्ट : विमा योजनेत समाविष्ट  पिके भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी :- शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी  मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद  यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भात, कापूस, सोयाबीन  पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६०% भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच  असावा, पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात, आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे, विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा  कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता  किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत  १५ जुलै २०२४ आहे.

सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम, यात जिल्हानिहाय फरक संभवतो.

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु.४०००० ते ५१७६०, ज्वारी रु.२०००० ते ३२५००, बाजरी रु १८,००० ते ३३,९१३, नाचणी रु. १३७५० ते २००००, मका रु ६००० ते  ३५५९८,  तूर रु २५००० ते ३६८०२, मुग २०००० ते २५८१७, उडीद रु. २०००० ते २६०२५, भुईमुग रु. २९००० ते ४२९७१, सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७,  तीळ रु. २२००० ते २५०००, कारळे रु. १३७५०, कापूस रु. २३००० ते  ५९९८३, कांदा रु. ४६००० ते ८१४२२.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

Previous Post

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Related Posts

उद्योगांनी पुढे येऊन युवकांना द्यावी आधुनिक कौशल्यांची ताकद”
कृषी

उद्योगांनी पुढे येऊन युवकांना द्यावी आधुनिक कौशल्यांची ताकद”

14 July 2025
पालकमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा |जिल्हाधिकारी आणि सीईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार |
आरोग्य

पालकमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा |जिल्हाधिकारी आणि सीईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार |

7 July 2025
पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!
आरोग्य

पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!

9 July 2025
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
आरोग्य

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

11 July 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक संनियंत्रण कक्ष व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन..
कृषी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक संनियंत्रण कक्ष व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन..

6 July 2025
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाखांहून अधिक वारकरींना विश्रांती.!
कृषी

मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाखांहून अधिक वारकरींना विश्रांती.!

9 July 2025
Next Post
कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.