MH 13 NEWS NETWORK
सोलापूर – सध्याच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत.संपूर्ण जगात महिला कोणत्याच क्षेत्रात कमी अथवा मागे नाहीत हे अनेकदा सर्वांनी पाहिलंय परंतु महिलांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवन पूर्वी महिला म्हणजे फक्त चूल मूल व घर आदी पुरतेच मर्यादित, असे समीकरण होते.असे असताना सध्याच्या काळात या समिकरणाला फाटा देत अनेक महिलांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेताना पाहायला मिळते त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या संजीवनी व्हट्टे यांना नुकताच माता रमाई जयंती निमित्त रमाई सेवाभाव संस्थेच्या वतीने फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मी रमाईची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदरील पुरस्कार भाजपा सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे पोलीस उपायुक्त दिपाली काळे पुरस्कार सोहळ्याचे आयोजक राजू माने यांच्या सह विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पडत पोलीस उपनिरीक्षक सारख्या मोठ्या पदावर नेहमीच सतर्क व तत्पर राहून उत्तम पद्धतीने काम करत पोलीस प्रशासनाच्या स्लोगन सद्रक्षणाय खलनिग्रणाय च्या उद्देशाप्रमाने एक उत्तम कामगिरी आजवर करत आल्या आहेत.सदरील मी रमाईची लेक पुरस्कार मिळाल्याने संजीवनी व्हट्टे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आ