MH 13NEWS NETWORK
पॉलिटिकल ब्रेकिंग: ‘मध्य’ मतदार संघात काँग्रेसला दे धक्का..! सामूहिक राजीनामा सत्र..!
सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ समाज हा काँग्रेसच्या पाठीशी कायम राहणारा असून जवळपास मोची समाजाचे लोकसंख्या सोलापूर शहरात व जिल्ह्यात एक लाखाहून अधिक आहे.शहर मध्य हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचे बाले किल्ले असून सदर मतदार संघामध्ये मोची समाजाचे एकूण मतदार ५०हजारहून अधिक आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये काही मोची समाजाच्या पक्षाकडून मागणी असतांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने मोची समाजातील काँग्रेस नेते यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकार परिषदेत बाबा करंगुळे, संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे, प्रा.नरसिंग आसादे, हणमंतू सायबोळू,दिनेश म्हेत्रे आदी मोची समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर शहर श्री आदि जांबमुनी मोची समाज काँग्रेस प्रेमी पदाधिकारी व कार्यकर्ताचे सामुहिक राजीनामा देत असल्याबाबतचे पत्र आज शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे देणार असल्याचे सांगितले.कार्यकर्त्याला संधी का मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.40 वर्षांपासून आम्ही प्रामाणिक कार्य केले परंतु सहनशीलतेचा अंत झाल्याने असे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.
राजीनामा देणारे मोची समाजातील काँग्रेस पदाधिकारी…
.समाजाला शब्द दिला होता..!
समाजाच्या वतीने माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणी केले असतांना आजतागायत पक्षाने कोणताही विचार न करता, जर मोची समाजाचे उमेदवार घोषणा नाही केल्यास मोची समाजाचे सर्व काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
शहर मध्य मध्ये सन २०१४ व २०१९ साली खासदार प्रणिती शिंदे यांना आमदार करण्यात आमचा सिंहाचा वाटा होता. त्याचा देखील विचार करुन मोची समाजाला यंदाही वेळी उमेदवार काँग्रेस पक्षाकडूनच घोषीत करावी असं ही आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.