MH 13 NEWS NETWORK
सोलापूर – स्व. आ.भा. सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्ट आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ जैन गुरुकुल प्रशालेत संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ हे होते. यावेळी मुख्य अतिथी उद्योजक प्रकर्ष संगवे, सचिव आशितोष शहा, मुख्याध्यापक राजकुमार काळे, स्पर्धा प्रमुख तथा उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, विश्वस्त राजू देशमाने आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सोनटक्के गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त राजू देशमाने यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी उद्योजक प्रकर्ष संगवे, अरुण धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून अरुण धुमाळ यांनी सोनटक्के गुरुजींच्या कार्याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी नर्सरी ते बारावी व खुल्या गटातील एकूण ६३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक देऊन गौरविले. यामध्ये शुभ्रा मंठाळकर, अभय कल्हाळीकर, समर्थ कुलकर्णी, समीक्षा नुने, शिवाय करवा, श्रेया डोलारे, अत्रेय कोमुलवार, पद्मजा दुलगे, देवांश क्षीरसागर, आर्वी राका, समृध्दी सुराणा, गौरी वडतिले, स्नेहा सुतार, पुष्पांजली बेलपवार, श्रध्दा खरात, रुचिता लामकाने व प्रतिक्षा सावंत या प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिकासह सन्मान करण्यात आला. यावेळी सहशिक्षक तेजस सावळे व सागर शहा यांनी यादीवाचन केले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी तनय गांधी, मिलिंद खोबरे, यांनी परिश्रम घेतले.
सहशिक्षिका प्रीती काळेगोरे व तृप्ती दुर्गे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.