Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आश्वासन पूर्ण : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी..- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, कृषी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
आश्वासन पूर्ण : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी..- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
0
SHARES
205
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर दिनांक 7:- जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.

आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजितमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतर्गत पंपगृह टप्पा क्रमांक एक, उर्दूगामी नलिका क्रमांक एक, शेलेवाडी मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता डॉक्टर एच टी धुमाळ, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील 24 गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या गावातील दुष्काळी परिस्थिती संपण्याबरोबरच 17 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन केलेले आहे. शासनाने जलसंपदा विभागाच्या विविध योजना राबवून सोलापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती संपवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास सातत्यपूर्ण वीजपुरवठा केला जात आहे विज बिल माफ करणारी व दिवसा सिटी पंपांना वीज पुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही देशातील पहिली कंपनी आहे. सौर कृषी पंप अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंप दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

राज्य शासन लेक लाडकी योजना, एसटी बस मध्ये महिलांना सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्याला दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय असे अनेक लोक कल्याणकारी निर्णय शासन घेत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी देऊन आज जवळपास 32 कामांचे भूमिपूजन होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रस्ताविकात एमआयडीसी रस्ते उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

यातून 24 गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विज बिल माफ योजनेअंतर्गत 48 हजार शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांची सवलत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास मतदारसंघातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Tags: BJP Maharashtrabjp SolapurDevendra fadanvisदेवेंद्र फडणवीस
Previous Post

असा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा..

Next Post

मराठा महिला उमेदवारांसाठी पवार,’नेता’,मोहिते उपमुख्यमंत्र्यांकडे..!

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
मराठा महिला उमेदवारांसाठी पवार,’नेता’,मोहिते उपमुख्यमंत्र्यांकडे..!

मराठा महिला उमेदवारांसाठी पवार,'नेता',मोहिते उपमुख्यमंत्र्यांकडे..!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.