MH 13 NEWS NETWORK
भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे.
सुरेखा विठ्ठल तोडकरी, वय ५२ वर्षे, व्यवसाय नोकरी, शिक्षीका, रा. विरभद्र निवास, घर नं.७, चाटला चौक, जोडभावी पेठ येथे 15 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती.
बेडरूम मधील कपाटातील सुमारे १७.७ तोळे सोन्याचे दागिने, तेवीस हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले होते.
जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 12 फेब्रुवारी रोजी फराह रशीद शेख वय-५१ वर्षे, व्यवसाय :-शिक्षीका, रा. शाब्दी अपार्टमेंट तिसरा मजला प्लॉट नं. १५, तेलंगी पाच्छा पेठ येथील घरात बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून, ३.५तोळे वजनाचे दागिने, एक लाख रुपये रोख रक्कम रु, चोरुन नेले.
सदर घटनेबाबत जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे दोन्ही गुन्हे भरदिवसा घडले असल्याने, गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेकडील सपोनि खेडकर यांचे तपास पथकातील पोकॉ. १७३३ इम्रान जमादार यांनी, अत्यंत सचोटीने व कौशल्याने, गुन्हयाचे घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षण करुन, तांत्रीक पुराव्याचे सहाय्याने चोरी करणारे संशयीत इसमास अधोरेखीत केले होते. त्यानंतर सपोनि शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी सदर संशयीत इसमाची गोपनीयरित्या माहिती काढली.
त्यानंतर, दि. १५/०२/२०२५ रोजी सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोकों/इम्रान जमादार व पोकों/राजकुमार पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत, वर नमूद दोन्ही ठिकाणी चोरी करणारे संशयीत इसमाचे ठाय-ठिकाण्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार, संशयीत इसम नाम अमन फैय्याज शेख वय-१९ वर्षे, रा. कसाईवाडा, कोहिनुर सिटी, आग्रा रोड, कुर्ला वेस्ट, मुंबई सध्या रा. नई जिंदगी सोलापूर यास सपोनि/शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सापळा लावून, तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना, मुद्देमालासह दि. १५/०२/२०२५ रोजी कुमठा नाका येथील क्रीडा संकूल रोडवरील पोस्ट ऑफिस जवळून ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याचे अंगझडतीत, (१) फिर्यादी सुरेखा विठठल तोडकरी यांचे घरातून चोरलेले १७७.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम रु. १३,०००/- व फिर्यादी फराह रशीद शेख यांचे घरातून चोरलेली रोख रक्कम रु.१०,०००/- असा एकुण १४,३९,०००/- (चौदा लाख एकोण चाळीस हजार रुपये) किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि.श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार- संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे यांनी केली आहे.