mh 13 news network
प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.