Tuesday, November 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भर बैठकीतून भाजप उमेदवार राम सातपुते यांचा फडणवीस यांना कॉल..पहा काय घडलं

MH13 News by MH13 News
3 years ago
in राजकीय
0
0
SHARES
1.2k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापूर : प्रतिनिधी

मोची समाजातील तब्बल २५० युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत या युवकांना न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या. मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या मोची समाजातील सुमारे २५० युवकांवर ३५३ कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली असता ‘पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत’ असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे सांगताच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. तसेच मोची समाजातील २५० युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली. “मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. काळजी करू नका”, असे आश्वासन यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोची समाजातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा या लोकसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे हे आपल्या मुला-मुलींना निवडून आणण्यासाठी धडपडत आहेत. महायुतीने मात्र आमदार राम सातपुते यांच्यासारख्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देऊन सर्वसामान्यांना न्याय दिला आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलापूरकरांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा सोलापूरसाठी आणण्याकरिता महायुती कटिबद्ध आहे.

युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवा सेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, दक्षिण तालुका प्रमुख संदिप राठोड, निहाल शिवसिंगवाले,
भाजपाचे भीमराव आसादे, हिंदूराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवी गोणे, श्री स्वामी समर्थ सोसायटीचे अध्यक्ष विनोद बागल, सचिव रविंद्र पाटील,
युवा सेनेचे उपशहर प्रमुख स्वप्निल कांबळे, दीपक पाटील, श्रीकांत गट्टू, सागर राजपूत, भीमा वाघमारे, मंगेश जंगडेकर, राहुल यमकोटे आदी उपस्थित होते.

Tags: Ram satpute Bjp
Previous Post

Live | राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग..! मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय

Next Post

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट ३३ कोटींची बचत – आदिवासी विकास विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.