Monday, February 23, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
0
SHARES
16
VIEWS
ShareShareShare

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दोन वर्षातील महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. मंत्री श्री. लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

गत दोन वर्षात कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्ययुक्त व बेरोजगारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडवणार आहे, हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

मंत्री श्री.लोढा पुढे म्हणाले की, विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंमरोजगार नोंदणी, प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Previous Post

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मोठी बातमी: हैदराबाद येथे गॅझेट तपासणीसाठी टीम रवाना ; सर्व राजकीय पक्षांनी…!

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post

मोठी बातमी: हैदराबाद येथे गॅझेट तपासणीसाठी टीम रवाना ; सर्व राजकीय पक्षांनी...!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.