महेश हणमे / MH 13News
छत्रपती संभाजी राजे चौक हे सोलापूरचे प्रवेशद्वार असून या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात रस्ते केल्यामुळे या ठिकाणी खडी मोठ्या प्रमाणावर पसरले आहे परिणामी वाहनधारक घसरून पडत आहेत. यात अनेक जण जखमीही झालेले आहेत. तरीही महापालिका प्रशासन अथवा ठेकेदार यांना जाग येत नाही असे चित्र दिसून येत आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे एम एच १३ न्यूज शी बोलताना सांगितले.