Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा 

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा 
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देणारी आहे. यापुढेही माध्यम प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांनी साताऱ्याच्या उज्वल विकासासाठी हातात हात घालून एकत्र काम करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री देसाई यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने पत्रकार, सर्व माध्यमांतील प्रतिनिधींसाठी आयोजित चहापान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह संपादक, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडीयाचे प्रतिनिधी, समाज माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्याला निर्भिड पत्रकारीतेचा वारसा असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, या आधीच्या पिढीतील अनेक दिग्गज पत्रकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारिता केली.  लोकहितकारी उपक्रमांना भरु भरुन पाठींबा देत असतानाच जिथे चुका व त्रूटी आढळलेल्या त्यावर कठोरपणे प्रहार करुन डोळ्यात अंजन घालण्याचे कामही त्यांनी केले. समाजातील अनिष्ठ प्रथा, समस्या यावर प्रकाश टाकून लोकांना जागरुक करण्याचे काम पत्रकारितेने केल्याचे सांगून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच झालेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संयोजक, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रशासकीय यंत्रणा यांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

खासदार नितीन पाटील यांनी यावेळी पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जे चांगले त्याला प्रसिद्धी देण्याचे आणि जिथे त्रुटी आढळल्या त्या निर्दशनास आणून देण्याचे कार्य साताऱ्यातील वृत्तपत्रे व मीडिया अव्याहतपणे करत आला आहे.  साताऱ्यातील वृत्तपत्रे आणि माध्यमांनी सकारात्मक पत्रकारितेचे व लोकहितासाठी अखंडपणे लढण्याचे व्रत कायमपणे जोपासले आहे. सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा जपत असतानाच जनतेला माहिती देणे आणि कोणतीही माहिती सत्य व वस्तुनिष्ठ स्वरुपात मांडणे असा येथील पत्रकारितेचा अनुभव आपण घेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी 32 वर्षांनंतर साताऱ्यात झालेले 99 वे अखिल भारतीय संमेलन यशस्वी करण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे वरिष्ठ पत्रकार असून हे साहित्य संमेलन साताऱ्यात आणण्यात आणि चार दिवसांचे साहित्य संमेलन अनेक नवीन मापदंडांसह निर्माण करत यशस्वी करण्यात त्यांच्या बजावलेल्या भूमिकेचा अभिमान असल्याबाबत गौरवपूर्ण उद्गार काढले.

यावेळी कुलकर्णी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी यांनी प्रशासनाने या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याबद्दल प्रशासन व सर्वच घटकांचे आभार मानले.

०००

Previous Post

राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा  निकाल जाहीर

Next Post

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.