लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यादीत बीडमधून बजरंग सोनावणे ( Bajrang Sonawane) तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. गेल्या निवडणुकीत प्रीतम मुंडे ( भाजप – 6,78, 175 मत ) यांनी बजरंग सोनावणे यांचा तब्बल 1 लाख 78 हजार 920 मतांनी पराभव केला होता.
बजरंग सोनवणे यांना 5,09,807 मतदान झाले यात धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे यावेळी सोनावणे यांना हि निवडणूक जड जाणार आहे. कारण धनंजय मुंडे हे आता महायुतीत म्हणजेच पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील प्रमुख नेते करणार आहेत.