छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच भुमरेंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील प्रमुख नेते करणार आहेत.