MH 13 News Network
महाराष्ट्र शासन विविध लोकोपयोगी योजना राबवत असून लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. लाडका भाऊ, लाडका शेतकरी, यासोबतच विविध सामाजिक घटकांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरेल.
मुख्यमंत्री वयोश्री योजना..
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ही योजना कार्यान्वित होणार आहे.
या योजनेसाठी राज्यातील दोन लाख 14 हजार 978 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात #मुख्यमंत्रीवयोश्रीयोजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात २ लाख १४ हजार ९७८ अर्ज पात्र झाले आहेत.