mh 13 news network
विष्णू करमपुरी(महाराज)
सोलापूर दि.17/2/2024 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून त्या दिवशी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने घरोघरी शिवजयंती साजरी या उत्सवा अंतर्गत 51 महिला बिडी कामगार कुटुंबीयांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक विष्णू कारमपुरी(महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून ही जयंती घराघरात साजरी व्हावी या उद्देशाने मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब महिला विडी कामगारांच्या कुटुंबीयांना शिवरायांचे मूर्ती वाटप करण्याचा संकल्प केला त्यानुसार 19 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र कामगार सेनाकार्यालय कुचन नगर( पद्मशाली चौक) येथे शिवजयंती साजरा करून 51 मूर्ती वाटप करण्यात येणार आहेत
तरी सदर कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिक व कामगार बंधू भगिनी उपस्थित रहावे असे आव्हान मी सोलापूर मध्ये सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने संस्थापक विष्णू कारमपुरी(महाराज)यांनी केले आहे