Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बोला बोला भक्तलिंग हर्र | शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून शक्तीरुपी उर्जा – श्रीराम ढाले, प्राचार्य

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
बोला बोला भक्तलिंग  हर्र | शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून शक्तीरुपी उर्जा – श्रीराम ढाले, प्राचार्य
0
SHARES
130
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

“वीरतपस्वी प्रशालेतून निघाली सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची भव्य मिरवणूक”

ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सात नंदीकाठ्यांचे पूजन व भव्य मिरवणूक संपन्न

“ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून शक्तीरुपी ऊर्जा” -प्राचार्य श्री. राम ढाले

सोलापूर: “ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून ही एक ऊर्जा आहे. धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्याची सुरुवात या नामघोषाने केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते.” असे श्री. बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले यांनी प्रतिपादन केले. वेदमूर्ती श्री. मन्मथेश्वर हिरेमठ यांच्या मंत्रोच्चाराने मिरवणुकीस सुरुवात झाली. सोलापूर नगरीत सिद्धारामेश्वरांच्या नामाच्या जयघोषाची परंपरा जपण्याचे काम वीरतपस्वी प्रशाला करते.

बोला बोला भक्तलिंग हर्र….बोला या शब्दांत चैतन्य निर्माण करणारी, प्रेरणा देणारी आध्यात्मिक ऊर्जा आहे. मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणाऱ्या शब्दांत जयघोष करत सिद्धारामेश्वराच्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तीचा मळाच फुलला होता.

श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा काशी पिठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ धर्मरत्नं डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या आदेशाने एस. व्ही. सी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भवानी पेठ, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धारामेश्वरांच्या काठ्यांची भव्य मिरवणूक श्री. बृहन्मठ होटगी संस्थेचे संचालक श्री. शशिकांत रामपुरे, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

याप्रसंगी परिसरातील सद्भक्तांनी श्री सिद्धारामेश्वरांच्या प्रतिमेचे आणि नंदीध्वजांचे दर्शन घेऊन भक्तीभावाने वंदन केले. यासमयी नगरातील श्री. प्रभुराज विभुते, सौ. अरुणा काटकर, श्री. केदारनाथ बावी (मालक) या भक्तगणांकडून प्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे , पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी स्काऊट गाईडचे प्रमुख श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गीताभारती रामपुरे, विद्या साबळे, रेखा मड्डे, रविराज पाटील तसेच प्रशालेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम केले.

प्रभातफेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

Tags: solapurSolapur Maharashtraवीर तपस्वी प्रशालाश्री सिद्धरामेश्वर
Previous Post

जैन गुरुकुलचा’ दिग्विजय सुरवसे राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय

Next Post

धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
Next Post
पत्रातालीम मध्ये भांडण लावली, नानांमुळे एकत्र आली.! भरघोस मते मिळणार – महेश कोठे

धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.