Monday, September 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

MH13 News by MH13 News
1 day ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

MH13 News network

वाहतूक शिस्तीपासून विमानसेवा, उच्च न्यायालयीन खंडपीठ आणि पर्यावरण संवर्धनापर्यंत विविध विषयांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या मित्राला सोलापूर मुकले

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक, गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सोलापूर विकास मंचचे सक्रिय सदस्य विजय कुंदन जाधव यांचे शनिवारी मध्यरात्री दुर्दैवी अपघातात निधन झाले. शनिवारी मध्यरात्री साधारण 12 च्या सुमारास डीआरएम कार्यालयासमोर दुचाकीला अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सोलापूर शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांत शोककळा पसरली आहे.

शहराच्या विकासासाठी सातत्याने आवाज उठवणारा कार्यकर्ताविजय जाधव यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडली. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, सार्वजनिक परिवहन, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि नियोजनबद्ध विकास यांसारख्या विषयांवर त्यांनी शासन दरबारी तसेच सामाजिक माध्यमांतून आवाज उठवला.शहरातील वाहतुकीचे नियम नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पाळावेत, याबाबत ते विशेष आग्रही होते.

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासोबतच नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने भूमिका मांडत असत.सोलापूर शहरातील मोडकळीस आलेली परिवहन व्यवस्था सुधारावी, यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आंदोलने आणि उपोषणांमध्ये सहभाग घेतला.

जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन तसेच सामाजिक माध्यमांवरील सक्रिय चळवळीच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.उच्च न्यायालयीन खंडपीठासाठी मोलाचा सहभागसोलापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्यात विजय जाधव यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

सोलापूरच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांनी सहकाऱ्यांसोबत चर्चा करून जनजागृती करण्याचे काम केले.शहरातील ५४ मीटर रस्ता, आयटी पार्क, सार्वजनिक परिवहन आणि औद्योगिक वसाहतींमधील रोजगारनिर्मिती यांसह अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

‘मिशन ३८’मधून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प..

सोलापूर जिल्ह्याचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने विजय जाधव यांनी ‘मिशन ३८’ हा उपक्रम सुरू केला होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग होता. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणविषयक स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता.पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सहभाग या विषयांवर त्यांनी विविध उपक्रमांतून योगदान दिले.

रोटरी क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.

तब्बल ६३ वेळा रक्तदान; आपत्कालीन रुग्णांसाठी प्लेटलेट्स दान..

सामाजिक कार्यासोबतच रक्तदानाच्या माध्यमातूनही विजय जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी आजपर्यंत ६३ वेळा रक्तदान केले होते. नुकत्याच देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी ६३वे रक्तदान केले होते.आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी त्यांनी अनेक वेळा अ‍ॅफेरेसिस प्लेटलेट्सदान केले. गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा पुढाकार त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.

शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग..

विजय जाधव यांचा शैक्षणिक क्षेत्राशीही जवळचा संबंध होता. अनेक महाविद्यालयांमध्ये ते अतिथी व्याख्याते आणि परीक्षक म्हणून सहभागी होत असत. ‘फ्युचर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने दिली होती.

अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, विमानसेवा, सार्वजनिक परिवहन, पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि आरोग्य यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती.

सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका..

सोलापूरला लागलेले कलंक म्हणून मावा, मटका आणि मिरवणुकांशी संबंधित गैरप्रकार पूर्णपणे बंद व्हावेत, अशी भूमिका विजय जाधव सातत्याने सामाजिक माध्यमांतून मांडत असत. शहरातील विविध प्रश्नांवर ते स्पष्टपणे व्यक्त होत आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करत असत.

गणरायाचे पूजन अन् दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला…

सोलापुरातील एका हेल्थ क्लबमध्ये शनिवारीच विजय जाधव यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन करण्यात आले होते. मात्र, त्याच रात्री झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाल्याने मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. सोलापूर विकास मंचच्या प्रसिद्धीची मुख्य जबाबदारी सांभाळताना त्यांनी मोलाचे कार्य केले होते.सामाजिक कार्याची धडपड, शहराच्या विकासासाठीची तळमळ आणि मित्रत्वाचा जिव्हाळा अशी विजय जाधव यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सोलापूरने एक सक्रिय युवा समाजसेवक आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा कार्यकर्ता गमावला आहे.

आज रविवारी सकाळी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय( सिव्हिल हॉस्पिटल) येथे त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. त्यानंतर अवंती नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव नेणार आहेत.

Tags: solapurSolapur MaharashtraVijay kundan jadhav
Previous Post

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.