Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur |क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत..

MH13 News by MH13 News
9 months ago
in गुन्हेगारी जगात, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur |क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत..
0
SHARES
1.7k
VIEWS
ShareShareShare

सोलापुरातील क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस; आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत

सोलापूर, दि. ४ जून २०२५ – सोलापुरातील होटगी रोडवरील टाटा कंपनीच्या क्रोमा शोरूममध्ये चोरी करून तब्बल ४० लाख रुपयांच्या मोबाईल फोनसह मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

आरोपीकडून ३६,३३,८२९ रुपयांचे ६७ महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.दिनांक ३० मे २०२५ रोजी रात्री, टाटा क्रोमा शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने अॅपल, सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, विवो व नथिंग या कंपन्यांचे एकूण ७८ मोबाईल फोन व क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची बॅग असा एकूण ४०,४१,२२० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.

यासंदर्भात शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे, स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकास एका संशयितावर लक्ष केंद्रीत करता आले.

पुढील तपासात तो रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता (वय ३७, रा. दिवा, ठाणे) असल्याचे निष्पन्न झाले, जो एक आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांत घरफोडी व मोबाईल शॉपी फोडण्याचे गुन्हे दाखल आहेत.

दिनांक ३ जून २०२५ रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत असताना रामनिवास गुप्ताला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६७ महागडे मोबाईल फोन, एक काळी पिशवी व त्याचा वापरात असलेला मोबाईल असा एकूण रु. ३६,३३,८२९ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपआयुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स.पो.नि. शैलेश खेडकर, सपोनि विजय पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, इब्राहीम शेख आदींनी अत्यंत कौशल्याने व झपाट्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

Tags: solapurSolapur MaharashtraSolapur police
Previous Post

Mohol | गर्भवती विवाहितेची आत्महत्या: सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल..!

Next Post

Breaking |पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटी ; तीन गंभीर तर 18 प्रवासी किरकोळ जखमी..

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
Breaking |पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटी ; तीन गंभीर तर 18 प्रवासी किरकोळ जखमी..

Breaking |पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटी ; तीन गंभीर तर 18 प्रवासी किरकोळ जखमी..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.