MH13NEWS network
राष्ट्रीय महामार्ग 65 वर साई गणेश ट्रॅव्हल्स पलटी; ३ गंभीर, १८ प्रवासी किरकोळ जखमी
टेंभुर्णी (जि. सोलापूर) | ५ जून २०२५:अहमदपूर (जि. लातूर) येथून पुण्याकडे जाणारी साई गणेश ट्रॅव्हल्स (क्र. MH 48 K 1981) ही प्रवासी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मो. आढेगाव (ता. माळशिरस) हद्दीत अपघातग्रस्त झाली. गुरुवारी पहाटे सुमारे ३:५१ वाजता हा अपघात घडला असून बस उलटून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते. यापैकी ३ प्रवासी गंभीर जखमी असून १७ ते १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, PSI धापटे, हायवे पेट्रोलिंगचे HC पवार व PC इंगोले, अपघात पथकाचे HC सरडे आणि पोलीस मित्र HC कदम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे उपचारासाठी हलवले.
यासाठी अकबर खान यांची खासगी ॲम्ब्युलन्स, १०८ आपत्कालीन सेवा आणि टोल नाक्यावरील ॲम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला.जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ट्रॅव्हल्सच्या चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.