MH 13 NEWS NETWORK
बारावे वार्षिक अधिवेशन लोकमंगल कॉलेज वडाळा.
सोलापूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असणारे अनेक विद्यार्थी घडावेत, शास्त्रज्ञ तयार व्हावेत ,तर भविष्यात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जाईल. त्यासाठी आपण सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या माध्यमातून विज्ञान शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या अधिवेशनाप्रसंगी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांचे बारावे वार्षिक अधिवेशन लोकमंगल कॉलेज वडाळा, ता. उत्तर सोलापूर येथे सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी पार पडले लोकमंगल अग्रीकल्चर कॉलेजचे प्राचार्य माननीय फुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ शेती, वर्मी कंपोस्टिंग, टिशू कल्चर, जैविक खत निर्मिती आदी विषयावर अग्रीकल्चर कॉलेजमधील प्राध्यापकांनी उपस्थित शिक्षकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान शिक्षकांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात डॉक्टर होमी भाभा चे निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर वेळापूर डायटचे अधिव्याख्याता प्रा. शिंदे सर, उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, विस्ताराधिकारी बापूराव जमादार उत्तर सोलापूर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष शंकर वडणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या अधिवेशनास सुरुवात झाली यामध्ये विज्ञान प्राविण्य व प्रज्ञा परीक्षेमधील प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट शाळा व इयत्ता ६ वी व ९वी मधील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळेचा गौरव करण्यात आला.
. दुपारच्या सत्रात जिल्हास्तरीय आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तर विज्ञान विषयक उत्कृष्ट कार्य करणारे नीलाप्पा जवळकोटे सर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुका अध्यक्ष यांचा सत्कार दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख डॉ. होमी बाबाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर यांच्या उपस्थित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी केले तर अहवाल वाचन मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, सूत्रसंचालन शीतल पाटील तर आभार प्रदर्शन शिवाजी पाटील यांनी केले याप्रसंगी जिल्हा व सर्व तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते उ. सोलापूर विज्ञान मंडळ आणि लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पालक जिल्ह्यातील बहुसंख्य विज्ञान शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी लोक लोकमंगल कॅम्पसच्या सचिवा डॉक्टर अनिता ढोबळे मॅडम तसेच प्राचार्य डॉक्टर फुगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते अध्यक्ष संजय जवंजाळ सचिव जब्बार शिकलगार कार्याध्यक्ष शिवाजी चापले परीक्षा प्रमुख संतोष दोडयाळ उत्तर तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील सचिव भारत पांढरमिशे व शीतल पाटील, जिल्ह्यातील सर्व विज्ञान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.