Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अस्सल सोलापुरी: समस्यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा ; यावर फडणवीस काय म्हणाले..! वाचा 

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
4k
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन

सोलापूरच्या समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश_

सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेतली आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी महत्वाच्या मागण्या केल्या. फडणवीस यांनी सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

भेटीत घडलं काय..!

एका बाजूला दहा पेक्षा अधिक आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध कामांसाठी थांबलेली असताना सोलापूर विकास मंचच्या सदस्यांच्या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सोलापूरकडे माझे लक्ष असून 80 टक्के विकासाची कामे झाली आहेत उर्वरित कामे लवकरच होतील असे आश्वासन उपस्थित सदस्यांना दिले. त्यासोबत निवेदनातील सर्व मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्याचे अभिवचन दिले.

यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य योगीन गुर्जर यांनी अनेक विकास कामांची शास्त्रीय पद्धतीने थोडक्यात पोलखोल फडणवीस यांच्यासमोर केली. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याची स्पष्ट वस्तुस्थिती त्यांनी मांडली .सोलापूरला शासनाकडून सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा अनुभव आला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावर फडणवीस यांनी माझे सोलापूर कडे वैयक्तिक लक्ष आहे. 80 टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील असे सांगितले.

हे आहेत निवेदनातील मुद्दे..

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन



हिप्परगा तलावाच्या गाळमुक्तीसाठी आश्वासन…

सोलापूर शहराला पाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी हिप्परगा तलावाची गाळ मुक्तीचे महत्त्व विशद करुन दिले.

परिवहन सेवेत सुधारणा आवश्यक…

सोलापूर शहरासाठी परिवहन सेवेसाठी सोलापूर शहरात ई-बसेस ऐवजी सी.एन.जी. मिडी बसेस उपयुक्त ठरतील, असे मंचने रस्ताची रुंदी व वळणाचा अभ्यास करुन सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेचे फॉरेन्सिक ऑडिट..

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत, परंतु कामे व्यवस्थित झालेली नाहीत. या कामांचा कॅगद्वारे फॉरेन्सिक ऑडिट करून तपासणी करण्याची मागणी मंचने केली आहे.

युवा वर्ग विस्थापित होऊ नये ह्या करिता प्रयत्न आवश्यक…

गेल्या १० वर्षांत ४ लाख युवक सोलापूर सोडून गेले आहेत. शहरात आयटी आणि इंजिनिअरिंग उद्योग आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे अत्यावश्यक असल्याचे मंचने सांगितले.

बाह्यवळण रस्त्याची निर्माण त्वरित व्हावे…

सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव हा ५४ मीटर बाह्यवळण रस्ताचा निर्माण तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही मंचने केली आहे.



वरील सर्व मुद्दां बाबत सविस्तर माहिती मंच सदस्यांकडून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंचच्या सदस्यांना दिले. सोलापूर विकास मंचने देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे सोलापूरच्या विकासकामांमध्ये लवकरच प्रगती होईल अशी अपेक्षा आहे. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, महेश डोईजोडे, रोहित मोरे ,माजी आमदार डेसमेंड येट्स आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvis
Previous Post

थेट प्रवेश : सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी

Next Post

Video : शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा .!

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

Video : शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा .!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.