Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solpaur : मतदान केंद्रात वीज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
Solpaur : मतदान केंद्रात वीज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व 3 हजार 738 मतदान केंद्रावर वीज कनेक्शन उपलब्ध करून त्या ठिकाणी चांगली प्रकाश व्यवस्था आहे याची खात्री प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत क्षेत्रिय अधिकाऱ्यामार्फत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व नोडल अधिकारी व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे, सीव्हीजील चे नोडल अधिकारी आशिष लोकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी, तहसीलदार सरस्वती पाटील तर अन्य नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रकाशाची व्यवस्था चांगली राहील याची खात्री करावी प्रत्येक मतदान केंद्रावर आत मध्ये एक व बाहेर एक प्लग केलेला आहे परंतु मतदान केंद्राच्या आत मध्ये प्रकाश चांगला राहील याची दक्षता घेण्यात यावी. आपल्या अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व सेक्टर ऑफिसर यांना याबाबत खात्री करण्यास सूचित करावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु काही ठिकाणी रॅम्प व्यवस्थित करून घ्यावेत अथवा तात्पुरते बसवावेत असेही त्यांनी सुचित केले.
सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करून दिनांक 20 नोव्हेंबर रोजीची मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत. स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमपणे पुढील दोन-तीन दिवस राबवावेत. तसेच सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

Previous Post

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास

Next Post

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास – महादेव कोगनुरे, मनसे उमेदवार

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास – महादेव कोगनुरे, मनसे उमेदवार

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास - महादेव कोगनुरे, मनसे उमेदवार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.