Saturday, March 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात `कॅपॅसिटी बिल्डिंग अँड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक` या विशेष प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले होते.  प्रशिक्षण कार्यक्रमात १८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, क्षेत्रीय अधिकारी, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या इमारतीमधील रहिवासी, सोसायटीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाच्या निवडणुकीत २० मे २०२४ रोजी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निर्धार केला तर आपण नक्की एक सदृढ आणि सक्षम लोकशाहीकडे वाटचाल करू, असे `स्वीप`चे समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

निवडणुकीचे काम हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक दिवस देशासाठी या भावनेतून आपण सर्वांनी या कामात शंभर टक्के योगदान दिले पाहिजे. निवडणुकीच्या कामात शासन आणि मतदारांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपण सर्व आहात. जर आपण सर्वांनी ठरविले तर मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी जास्तीत-जास्त वाढवू शकतो. आपल्या या कामात जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य राहील, असे डॉ. दळवी यांनी सांगितले.

मतदानावेळी मतदारांना प्रेरित करण्यासाठी बूथ अवेअरनेस ग्रुप ( BAG ) सदस्यांनी प्रत्येकी २० घरांची जबाबदारी स्वीकारून मतदारांना प्रेरित व प्रोत्साहित करण्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले.

निर्भयपणे व निष्पक्षपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडण्यासाठी आम्ही मतदान करणार, असा संकल्प याप्रसंगी उपस्थितांनी केला.

या प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पानवेकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, नायब तहसीलदार चंद्रशेखर चांदोरकर, माहिम विभागाचे `स्वीप`चे समन्वय अधिकारी प्रकाश भंडारी हे उपस्थित होते.

Previous Post

२६- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता नेहा चौधरी खर्च निवडणूक निरीक्षक

Next Post

‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न

‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.