MH 13 NEWS NETWORK
मुंबई उपनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २६- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेच्या अधिकारी नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
श्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा पत्ता असा :
निवडणूक अधिकारी कार्यालय (26-मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ), जिल्हाधिकारी कार्यालय, सातवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व), मुंबई, 400 051 (मोबाईल क्रमांक 9372791082) असा आहे.
खर्च विभागाच्या निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी आज २६- मुंबई उत्तर मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी दिले.