MH 13 NEWS NETWORK
हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना मिळाली जगण्याची दुसरी संधी : डॉ. जाधव
सोलापूर : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील 10 रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. या रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून हृदय प्रत्यारोपणामध्ये मोठे शिखर गाठले आहे, अशी माहिती नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएराचे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे रुग्ण सर्व वयोगटातील म्हणजेच 29 ते 56 वर्षे वयोगटातील होते आणि त्यांच्यावर करण्यात आलेले प्रत्यारोपण 100 टक्के यशस्वी झाले आहे. हृदयरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णाना हृदय प्रत्यारोपणामुळे जगण्याची दुसरी संधी मिळते. अपोलो हॉस्पिटल्समध्ये, आम्ही एक व्यापक हृदय प्रत्यारोपण कार्यक्रम प्रदान करतो, जो शेवटच्या टप्प्यातील हृदयरोग असलेल्या व्यक्तीसाठी जीवन वाचवणारा उपाय ठरतो.
अंतीम टप्प्यातील हृदय निकामी झाल्याची समस्या उद्भवते आणि जेव्हा इतर सर्व वैद्यकीय उपचार रुग्णाची समस्या सोडविण्यात अपयशी ठरतात तेव्हा हृदय प्रत्यारोपण ही एक महत्वांची आणि जीवन वाचवणारी प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रक्रियेमध्ये मृत दात्याकडून हृदय घेतले जाते व निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवले जाते. भारतात हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रत्यारोपणाची टीम, जलद वाहतूक प्रणाली आणि दाता व प्राप्तकर्ता यांच्यामधील अचूक समन्वयाची आवश्यकता आहे.

ही हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया म्हणजे नवीन बाय-केव्हल टेजिक होती, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी दात्याचे निरोगी हृदय बनवले जाते. बाय- कव्हल ट्रेकिंग द्वारे ॲट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरचे सामान्य शरीर रचना राखून ठेवली जाते शस्त्रक्रिया दरम्यान आणि शस्त्रक्रिया नंतरचे गुंतवणूक खप कमी होते. दरम्यान, आत्तापर्यंत अपोलो हॉस्पिटलमध्ये 348 मूत्रपिंड प्रत्यारोपण, 204 यकृत प्रत्यारोपण आणि दहा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहे,असे डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णांनी ऑनलाईन पद्धतीने पत्रकारांना यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली.