MH 13 NEWS NETWORK
सोलापूर शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने शहर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. त्याचसोबत ड्रंक अँड ड्राईव्ह याबाबत ही तपासणी जोरात सुरू आहे.


शहरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या त्यावर पोलिसांनी कमी कालावधीत याचा शोध घेऊन कारवाई केली. त्याचसोबत ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाबाबत पोलीस आयुक्तांनी स्पष्ट आदेश संबंधित खात्याला दिलेले आहेत.



याच पार्श्वभूमीवर सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी बॅरिकेट्स लावून दुचाकी धारक तसेच चार चाकी वाहनांची तपासणी केली जात आहे.
बाळे भागातील मुख्य चौकात ही पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात असून या ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी करण्यात आलेली आहे.