सोलापूर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई – जबरी चोरी करणारे दोन आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद; १.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर – सोलापूर शहरात देवदर्शनावरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावणाऱ्या दोन आंतरजिल्हा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत केलेल्या या यशस्वी कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही घटना दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वा. घडली. तक्रारदार सौ. रेखा सिध्देश्वर बिजली (वय ३३, गृहिणी, रा. मंत्रीचंडक नगर, भवानी पेठ, सोलापूर) या देवदर्शनावरून पायी घरी जात असताना, दीप हॉस्पिटलजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले व मोटारसायकलवरून पळून गेले.
याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात IPC 2023 कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे व.पो.नि. श्री. सुनिल दोरगे व सपोनि शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फूटेजद्वारे आरोपींचा माग काढत, अत्यंत कौशल्याने त्यांची ओळख पटवली.
गोपनीय माहितीच्या आधारे दि. २ मे २०२५ रोजी, रुपाभवानी मंदिर मार्गावर सापळा लावून, दोन संशयित आरोपी –(१) हणमंत रामचंद्र बोडके (वय २२, रा. पाथरुड, धाराशिव)(२) नागेश उर्फ नागनाथ दयाप्पा पाटोळे (वय २३, रा. सांगली, सध्या रा. धाराशिव)यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:Yamaha FZ काळ्या रंगाची मोटारसायकल – ₹१,००,०००/-१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र – ₹७०,०००/-Vivo कंपनीचा मोबाईल – ₹१०,०००/-एकूण मुद्देमाल – ₹१,८०,०००/-
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजन माने, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.