MH 13News network
सोलापूरमधील पाण्यावरील नासाडी हे एक चिंताजनक वास्तव आहे.सोलापूर शहर व हद्दवाढ भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या उजनी धरण व हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी घटली असून उपलब्ध पाणी साठा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी सोलापूर महापालिकेने कटाक्षाने पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
महापालिकेच्या निरीक्षणात आले आहे की काही नागरिक पिण्याच्या पाण्याचा वापर धुणे, भांडी, वाहने धुणे, तसेच रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करीत आहेत.
या कारणास्तव रस्त्यांची झीज होत असून खड्डे पडत आहेत आणि साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कठोर भूमिका घेत नागरिकांना इशारा दिला आहे.

पिण्याचे पाणी वाया घालणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करत २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच संबंधित विभागांना हे आदेश दिले आहेत की दंड न भरल्यास त्याची वसुली कर आकारणी व संकलन विभागामार्फत करण्यात यावी. असे परिपत्रक महापालिका आयुक्त यांनी काढले आहे.

पाणी ही अनमोल संपत्ती आहे, तिचा अपव्यय केल्यास आता आर्थिक दंडास सामोरे जावे लागणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी गळकी पाईपलाइन:
सोलापूरमधील अनेक भागांमध्ये जुन्या आणि झिजलेल्या जलवाहिन्यांमधून दिवसेंदिवस पाणी गळत आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, पण वेळेवर दुरुस्ती न झाल्याने समस्या अधिक गभीर होते आहे
.2. टॅप चालू ठेवणे व दुर्लक्ष:
घरगुती वापरात लोक नळ चालू ठेवून कामे करताना दिसतात, विशेषतः सार्वजनिक नळांवर, जिथे पाणी भरून घेताना ५–१० मिनिटे पाणी वाहत असते. ही अनावश्यक नासाडी नागरिकांच्या अनास्थेचे दर्शन घडवते.
. गार्डनिंग व वाहन धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर:
नळाचे पाणी गार्डनिंग, रस्ते व वाहन धुण्यासाठी वापरण्यात येत आहे. हे पाणी पिण्यासाठी असताना अनेक सोलापूरकर याचा गैरवापर करताना दिसून येतात.