Friday, May 9, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदानासाठी यंत्रणा सज्ज; मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

MH 13 News by MH 13 News
11 May 2024
in महाराष्ट्र
0
मतदानासाठी यंत्रणा सज्ज; मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

  • चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान ; 23 हजार 284 मतदान केंद्र
  • सुमारे 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
  • तिसऱ्या टप्प्यात सरासरी 63.55 टक्के मतदान
  • विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर  

मुंबई, : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्पात एकूण सरासरी 63.55 टक्के मतदान झाले.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

यासाठी एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ५३,९५९ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,२८४ आणि २३,२८४ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात एकूण 78 हजार 460 शस्त्र परवाने वितरीत करण्यात आली आहेत. त्यापैकी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 9 मे पर्यंत 50,831 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे.  परवाने रद्द करून 1,132 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,851  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,22,834 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 9 मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 59.29 कोटी रोख रक्कम तर 45.72 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 162.40 कोटी रुपये, ड्रग्ज 244.59 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०१.६६ कोटी रुपये अशा एकूण ६१४.१४ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४१,१३४ तक्रारी निकाली

16 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ५४३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ५४१५ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४१,९६५ तक्रारीपैकी ४१,१३४ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समितीमार्फत जाहिरातीच्या पूर्वप्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 236 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर  

भारत निवडणूक आयोगाच्या 8 मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानुसार बुधवार, 15 मे रोजी अधिसूचना निर्गमित करणे,  नामनिर्देशनाची शेवटची तारीख 22 मे, नामनिर्देशन पत्राची छाननी 24 मे  रोजी होईल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख 27 मे अशी आहे. तर 10 जून रोजी सकाळ 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर 13 जून रोजी मतमोजणी करण्यात येईल.

तिसरा टप्पा:-

तिसऱ्या टप्प्यातील कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.07.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरूष मतदारमतदान केलेले पुरूष मतदारमहिला मतदारमतदान केलेल्या महिला मतदारतृतीयपंथी मतदारमतदान केलेले तृतीयपंथी मतदारएकूण मतदार टक्केवारी
132-रायगड8,20,6054,58,629(55.89%)8,47,7634,67,561(55.15%)0400(00.00%)55.51%
235-बारामती12,41,945 7,74,383(62.35%)1130607 6,37,219(56.36%)11619(16.38%)59.50% 
340-धाराशीव (उस्मानाबाद)10,52,096 6,90,533(65.63%)9,40,5605,82,416(61.92%)8120(24.69%)63.88%
441-लातूर10,35,376 6,64,630(64.19%)9,41,6055,72,700(60.82%)6125(40.98%)62.59% 
542-सोलापुर10,41,470 6,45,015(61.93%)9,88,450 5,56,515(56.30%)199 56(28.14%)59.19% 
643-माढा10,35,678 6,90,054(66.63%)9,55,706 5,77,446(60.42%)70 30(42.86%)63.65% 
744-सांगली9,53,024 6,22,054(65.27%)9,15,026 5,41,267(59.15%)124 32(25.81%)62.27% 
845-सातारा9,59,017 6,22,414(64.90%)9,30,647 5,69,432(61.19%)76 23(30.26%)63.07% 
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग7,14,945 4,59,104(64.21%)7,36,673 4,48,513(60.51%)12 01(09.09%)62.52% 
1047-कोल्हापुर9,84,734 7,24,734(73.60%)9,51,578 6,61,457(69.51%)91 39(42.86%)71.59% 
1148-हातकणंगले9,25,851 6,78,590(73.15%)8,88,331 6,11,453(68.72%)95 30(57.78%)71.11% 

चौथा टप्पा:-

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी व 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावमतदान केंद्रेक्रिटीकल मतदान केंद्रेनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याबॅलेट युनिट (बीयु)कंट्रोल युनिट(सीयु)व्हीव्हीपॅट
101 नंदुरबार2,115061121152,1152,115
203 जळगाव1,982021419821,9821,982
304 रावेर1,904012438081,9041,904
418 जालना2,061132641222,0612,061
519 औरंगाबाद2,040203761202,0402,040
633 मावळ2,566083376982,5662,566
734 पुणे2,018103560542,0182,018
836 शिरूर2,509013275272,5092,509
937 अहमदनगर2,026012540522,0262,026
1038 शिर्डी1,708042034161,7081,708
1139 बीड2,355174170652,3552,355
एकूण23,2848329853,95923,28423,284

मतदारांची संख्या

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुण85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
101 नंदुरबार9,92,9719,77,3292719,70,3272505
203 जळगाव10,37,3509,56,6118519,94,0461250
304 रावेर9,41,7328,79,9645418,21,750888
418 जालना10,34,1069,33,4165219,67,5741562
519 औरंगाबाद10,77,8099,81,77312820,59,7101002
633 मावळ13,49,18412,35,66117325,85,018321
734 पुणे10,57,87010,03,08232420,61,276514
836 शिरूर13,36,82012,02,67920325,39,702490
937 अहमदनगर10,32,9469,48,80111919,81,866824
1038 शिर्डी8,64,5738,12,6847816,77,335834
1139 बीड11,34,28410,08,2342921,42,547410
एकूण1,18,59,6451,09,40,2341,2722,28,01,15110,600

             चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूक करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्य बळाचे रॅन्डमाझेशन करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅन्डमाझेशन झाले आहे.

या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनींग करण्यात येत आहे.  संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इपीक (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे.

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.   चौथ्या टप्प्यातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलेन्स पिरियड (Silence Period) आहे.  सबब सदर लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश  आहेत.

एकंदरीत राज्यातील चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

पाचवा टप्पा:-

पाचव्या टप्प्यात 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पूर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण-मध्य, 31 मुंबई दक्षिण  अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 06.05.2024 असा होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावअंतिम उमेदवारांची  संख्या
102 धुळे18
220 दिंडोरी10
321 नाशिक31
422 पालघर10
523 भिवंडी27
624 कल्याण28
725 ठाणे24
826 मुंबई उत्तर19
927 मुंबई उत्तर-पश्चिम21
1028 मुंबई उत्तर-पूर्व20
1129 मुंबई उत्तर-मध्य27
1230 मुंबई दक्षिण-मध्य15
1331 मुंबई दक्षिण14
 एकूण264

पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा अंतिम तपशील खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुणमतदान केंद्रे
102 धुळे10,51,9289,70,0864720,22,0611,969
220 दिंडोरी9,60,3328,93,0381718,53,3871,922
321 नाशिक10,59,0489,70,9968020,30,1241,910
422 पालघर11,25,20910,23,08022521,48,5142,263
523 भिवंडी11,29,7149,57,19133920,87,2442,189
624 कल्याण11,17,4149,64,02178620,82,2211,955
725 ठाणे13,48,16311,59,00220725,07,3722,448
826 मुंबई उत्तर9,68,9838,42,54641318,11,9421,701
927 मुंबई उत्तर-पश्चिम9,38,3657,96,6636017,35,0881,753
1028 मुंबई उत्तर-पूर्व8,77,8557,58,79923616,36,8901,681
1129 मुंबई उत्तर-मध्य9,41,2888,02,7756517,44,1281,696
1230 मुंबई दक्षिण-मध्य7,87,6676,86,51622214,74,4051,539
1331 मुंबई दक्षिण8,32,5607,03,5654315,36,1681,527
एकूण1,31,38,526 1,15,28,278 2,740 2,46,69,544 24,553 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :- पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
102 धुळे16,75,36719,08,17320,22,061
220 दिंडोरी15,30,20817,32,93618,53,387
321 नाशिक15,93,77418,85,06420,30,124
422 पालघर15,78,14918,85,60021,48,514
523 भिवंडी16,98,58418,90,10020,87,244
624 कल्याण19,22,03419,65,67620,82,221
725 ठाणे20,73,25123,70,90325,07,372
826 मुंबई उत्तर17,83,87016,47,35018,11,942
927 मुंबई उत्तर-पश्चिम17,75,41617,32,26317,35,088
1028 मुंबई उत्तर-पूर्व16,68,35715,88,69316,36,890
1129 मुंबई उत्तर-मध्य17,37,08416,79,89117,44,128
1230 मुंबई दक्षिण-मध्य14,47,86614,40,38014,74,405
1331 मुंबई दक्षिण14,85,84415,54,17615,36,168

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्रमतदार संघाचे नाव18-1920-2930-3940-4950-5960-6970-7980 +
102 धुळे28,223 3,87,8134,50,4424,71,3173,10,9382,04,4671,09,40759,454
220 दिंडोरी35,7953,82,9514,15,9714,12,0062,76,2491,82,94197,63149,843
321 नाशिक28,7593,64,9794,78,9114,69,6983,26,2202,03,6611,06,84151,055
422 पालघर25,5254,12,2445,03,0954,89,4013,66,4972,12,06798,72140,964
523 भिवंडी39,3073,99,5365,03,0654,81,3593,42,2511,97,81788,18235,727
624 कल्याण29,6033,31,4545,00,5304,93,4653,67,7322,20,91199,94538,581
725 ठाणे37,0563,85,5055,71,2736,07,8174,49,5542,73,8311,30,42851,908
826 मुंबई उत्तर22,9292,57,0103,67,0974,13,4783,45,2182,36,5301,23,47546,205
927 मुंबई उत्तर-पश्चिम18,9722,43,9193,52,4083,97,4213,38,3542,17,8701,15,06151,083
1028 मुंबई उत्तर-पूर्व18,5072,37,9223,54,3213,87,5643,05,5791,95,9481,01,71635,333
1129 मुंबई उत्तर-मध्य19,1892,40,5813,53,0074,01,0703,39,5702,14,9041,16,29159,516
1230 मुंबई दक्षिण-मध्य15,8022,09,4363,11,3793,38,9842,81,8261,81,43194,55040,997
1331 मुंबई दक्षिण15,8761,78,8182,74,6383,36,1833,12,4562,17,2761,28,57472,347
          एकूण3,35,543 40,32,168 54,36,137 56,99,763 43,62,444 27,59,654 14,10,822 6,33,013 

पाचव्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघGeneral ObserverPolice ObserverExpenditure Observer
02 धुळे111
20 दिंडोरी112
21 नाशिक12
22 पालघर111
23 भिवंडी11
24 कल्याण111
25 ठाणे12
26 मुंबई उत्तर112
27 मुंबई उत्तर-पश्चिम12
28 मुंबई उत्तर-पूर्व111
29 मुंबई उत्तर-मध्य11
30 मुंबई दक्षिण-मध्य111
31 मुंबई दक्षिण11
एकूण130718

राज्याची माहिती:-

1)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था):– दिनांक   09.05.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.तपशीलसंख्या
1.राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने78,460
2.जमा करण्यात आलेली शस्रास्रे50,831
3.जप्त करण्यात आलेली शस्रे237
4.जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे1,851
5.परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे1,132
6.परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे17,676
7.राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या1,22,834

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

        राज्यामध्ये 01.03.2024 ते दि. 09.05.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातू इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.जप्तीची बाबपरिमाणरक्कम (कोटी मध्ये)
1रोख रक्कम–59.29
2दारु58,34,106 लिटर45.72
3ड्रग्ज18,57,130 ग्राम244.59
4मौल्यवान धातू22,06,705  ग्राम162.40
5फ्रिबीज51,284  (संख्या)0.47
6इतर73,18,009  (संख्या)101.66
 एकूण–614.14

         दि. 16 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सीव्हिजील (C-Vigil) ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या             5433 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 5415 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टल (NGSP Portal) वरील  41,965 तक्रारीपैकी 41,134 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समिती:- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 236 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका :-

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 8 मे च्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. :-

अ.क्र.कार्यक्रमाचा तपशीलदिनांक
1अधिसूचना निर्गमित करणेबुधवार, दि.15 मे, 2024
2नामनिर्देशनाचा शेवटचा दिनांकबुधवार, दि.22 मे, 2024
3नामनिर्देशन पत्राची छाननीशुक्रवार, दि.24 मे, 2024
4उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांकसोमवार, दि.27 मे, 2024
5मतदानाचा दिनांकसोमवार, दि.10 जून, 2024
6मतदान करण्याचा कालावधीसकाळी 08.00 ते दुपारी 04.00
7मतमोजणीचा दिनांकगुरुवार, दि.13 जून, 2024
8निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांकमंगळवार, दि.18 जून, 2024

Previous Post

कल्याण पूर्व मतदारसंघात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

Next Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज
महाराष्ट्र

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

9 May 2025
Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी
कृषी

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

8 May 2025
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश
गुन्हेगारी जगात

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

8 May 2025
NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…
महाराष्ट्र

NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…

8 May 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात

8 May 2025
Next Post
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.